लेखक : मुरलीधार खैरनार
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
एखादा रहस्यपट पहायला खुर्चीमध्ये बसावे आणि तो संपेपर्यंत जागेवरून उठूच नये असंच काहीसं होतं "शोध" ही कादंबरी वाचायला हाती घेतल्यानंतर. श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य,अत्यंत वेगवान - उत्कंठावर्धक असा घटनाक्रम,धाडस,रोमांचक अद्भुत थरार,कुटनीती या सर्वांतून साकारलेली उत्कृष्ट अशी कादंबरी म्हणजे "शोध".
शोध या कादंबरी चा विषयच मुळी जोडला गेलेला आहे तो म्हणजे आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या एका अतुलनीय पराक्रमा सोबत. ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवरायांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हापासून. साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरतेहून स्वराज्यात परत येताना,जवळपास ७ हजार जनावरांवर लादलेला लुटीतला २५ लाख कोटी रुपये किंमतीचा प्रचंड ऐवज हरवला! हो हो हरवला.....कुठे गडप झाला तो खजिना? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि तो हरवलेला खजिना शोधण्यासाठी आज वर्तमानात केलेली धडपड म्हणजेच "शोध".
वाचत असताना अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत मनात येत राहतो एकच प्रश्न तो म्हणजे "आता पुढे काय होणार?" आणि याच एका प्रश्नामुळे वाचक शेवटपर्यंत कथेसोबत जोडलेला राहतो.प्रत्येक २०-२५ पानां नंतर इतिहास आणि वर्तमानामध्ये होणाऱ्या थरारक घटनांची सांगड वाचकांचा कुठेही गोंधळ उडू न देता ज्या पद्धतीने केली आहे याचे सगळे श्रेय लेखकाला.वाचताना वर्तमानासोबतच इतिहास सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभा राहील अशी मांडणी.
शिवकाळातील अस्सल संदर्भ आणि वर्तमान काळातील वास्तव घटना यांची सांगड घालून अतिशय उत्कृष्टपणे लिहिली गेलेली ही मुरलीधर खैरनार यांची आवर्जून वाचावी अशी अस्सल मराठी थ्रिलर कादंबरी "शोध".
संदीप प्रकाश जाधव
पहिलाच प्रयत्न तरी पण अप्रतिम लिखाण, super👍👍🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद
DeleteNice one sandi keep it up
ReplyDeleteNice sandi keep it up
ReplyDeleteफार छान, आता वाचायची प्रबळ इच्छा आहे.
ReplyDeleteAwesome
ReplyDeleteछान लिहलस मित्रा... अजून काही ब्लॉग वाचायला मिळतील अपेक्षा..
ReplyDeleteभले बहाद्दर,👏👏👏
ReplyDeleteBlog वाचून वाटत नाही की हा पहिलाच प्रयत्न आहे.......एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भरपूर वाचनातून आलेली परिपक्वता.......
ReplyDeleteखूपच सुंदर लेखन......
नक्कीच "शोध" ही कादंबरी जितकी उत्कठावर्धक असेल तितकेच सुंदर पुस्तक परिचय रेखाटले आहे......
आता लवकरच वाचायला घेतो......
असेच अजून वेगवेगळ्या कादंबरीचे परिचय येवो आणि आमच्यासारख्या असंख्य वाचन प्रेमींना वाचनात न आलेल्या अप्रतिम पुस्तकांची मेजवानी मिळो हीच सदिच्छा.....
धन्यवाद जितू...
Deleteनक्कीच प्रयत्न करेन अधिकाधिक पुस्तकांचा परिचय देण्याचा
खूप छान
ReplyDeleteBhava jamalay .... ek no👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete